Sunday, October 11, 2009


काँग्रेस राष्ट्रवादीला सोलून काढीन : राज ठाकरे

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शिवतीर्थावर कडाडत असताना राज ठाकरे ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर गरजत होते. त्यांच्या भाषणात मराठी माणूस कसा नाडला जातोय. शिवतीर्थावरीव भाषणानंतर परप्रांतीयांचा शिरकावं राज्यात कसा होतोय. यावर त्यांनी ठाण्याच्या सभेत जास्त जोर दिला.
राज ठाकरे यांच्या ठाण्याच्या सेंट्र्ल मैदानावरील भाषणाचे काही महत्वाचे मुद्दे

राज्याच्या विकासाबद्दल कुणाला काही घेणं देणं नाही, माझ्या हातात 100 आमदार राहिले असते तर काँग्रेस- राष्ट्रवादीला सोलून काढलं असतं, अगदी केळासारखं.
सर्वात जास्त स्थलांतरीत ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळं जास्त प्रश्न उभे राहतायंत. जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येक ठिकाणी परप्रांतियांचा वावर वाढलायं, बाहेरून आलेले लोकं बस्तान बसवतायंत. त्यामुळे जास्तीत जास्त मराठीचा वापर करा तर ती टिकेल.
काँग्रेसवाल्यांना मराठीचे काही घेणे देणे नाही. पी चिदंबरम येथे येऊन इंग्रजीत बोलतात ते कसं चालतं?
सत्यजित रे यांनी आपले चित्रपट बंगालीत, रविंद्रनाथ टागोर यांनी आपलं साहित्य बंगालीत लिहलं तरी जगाने दखल घेतलीच ना.


उर्जा मंत्री तटकरेंवर कंदिलमध्ये भाषण करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रात रहायचं असेल तर मराठी माणसाच्या आदेशाप्रमाणे वागावं. हजारो किलोमीटरवरून येऊन दादागिरी करायची नाही. नाहीतर हा राज ठाकरे असाच वागेल.

हे आक्रमणच आहे, हा छुपा एजंडा आहे यांचा महाराष्ट्र काबीज करायचा डाव आहे.



तुम्हाला बाहेर काढतील हे हळूहळू. राज्यातलं एकेक शहर वेगळं करायचा यांचा डाव आहे. आघाडीने 1 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं.

रोजगार वाढविण्याच्या ऐवजी त्यांनी तो कमी केला.

मॉरिशसमध्ये बिहारींची संख्या जास्त आहे तरी मॉरिशसमध्ये एकही समुद्र किनाऱ्यावर छटपूजा होत नाही, दुबईतही छटपूजा होत नाही. ती फक्त मुंबईतच होते या माध्यमातून आम्ही किती पसरतोय हे त्यांना दाखवायचं असतं.

कितीही केसेस झाल्याना मला पर्वा नाही मी महाराष्ट्राच्या जे हिताचं आहे ना ते मी बोलत राहिन, महाराष्ट्रात जे काही उद्योग धंदे येतील त्यात शंभर टक्के भूमिपूत्रांनाच संधी दिली जाईल.


महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी किती दिवस आई-वडिलांसमोर मान खाली टाकून बसायचं,  नोकरी नाही मिळत म्हणून. खोटी रेशनिंग कार्ड, निवडणूक ओळखपत्र बनावायचे कशासाठी?
अशोक चव्हाण रोज चिमटा काढून घेतात, सकाळी मी मुख्यमंत्री आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी. खुर्ची मिळाल्यावर अशोक चव्हाणांची तब्बेत कशी सुधारलीय बघा.

2001  पर्यंतची यादी माझ्याजवळ आहे. त्यात परप्रांतीय किती आहेत याची आकडेवारी आहे. ही फक्त कागदोपत्री आहे. यापेक्षा जास्त 25 पट ही संख्या असेल. मुंबई शहर 7 लाख, मुंबई उपनगर 24 लाख, पुणे 5 लाख 43 हजार, नाशिक 1 लाख 43 हजार परप्रांतीय या शहरात आले आहेत.

शहरांचं काहीही नियोजन नाही, रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकायचे, रस्ता खराब झाला की पुन्हा पेव्हर ब्लॉक टाकायचे एवढाच उद्योग. बँकॉकमध्ये कायापालट होतो इथे का नाही?

आमचे पोलिस नक्षलवाद्यांकडून मारले जातात काही किंमत नाही, तरूण पोलिस शहीद झाले, कुणाला काही घेणं, देणं नाही. पोलिसांनी फक्त नाहक मरायचं, यांनी जमीनी घ्यायच्या, नातेवाईकांच्या तुंबड्या भरायच्या. हे कसाबलाही पोसतायत

सौजन्य स्टार माझा .